किल्लारी : औसा तालुक्यातील किल्लारी येथे वाढत्या करोना रुग्णामुळे किल्लारीमध्ये तीन दिवसाचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय किल्लारी ग्रामपंचायतने पोलिस ठाणे, महसूल विभाग ,व्यापारी आसोसिएशन ग्रामीण रुग्णालय किल्लारी यांच्या शिफारशीनुसार निर्णय घेऊन तहसिलदारांंना २२ ते २५ पर्यंत पाच दिवसाचे लॉकडाऊन करण्यात यावे म्हणून निवेदन देऊन परवानगी मागितली होती. परंतु आखेर तीन दिवसांचे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला किल्लारी येथे कोरोना रोजच्या रोज कोरोनाचे आनेक पॉझीटीव्ह रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे किल्लारी ग्रामपंचायत कार्यालयाने, पोलिस ठाणे, महसूल विभाग, ग्रामीण रुग्णालय, व्यापारी आसोसिएशन, यांच्या सहकार्याने किल्लारी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला यामुळे याला सर्वाचा पांठिबा मिळाला.
वैद्यकीय सुत्राकडून मिळलेल्या माहितीनुसार जानेवारी महिण्यात आतापर्यंत ८० रुग्णाना कोरोनाची लागण झाली आसून दररोज दहा ते पंधरा जण पॉझीटीव्ह येत आहेत. यामुळे वैद्यकीय आधीक्षक पाटील, वैद्यकीय अधिकारी सचीन बालकुदे, वैद्यकीय अधिकारी पांडुरंग दोडकेयानी मास्क वापरा, गर्दीत जाऊनका, हात साबनाने स्वच्छ धुवा, घरात जाताना स्वच्छ होऊन जावे, ताप सर्दी झाल्यास तात्कळ डॉक्टरासी संपर्क करून औषध उपचार करून घ्या, घाबरून जाऊ नका असे आवाहन नागरिकांना केले आहे.
ग्रामपंचायत कोरोनामय म्हणून सोमवारपासून तीन दिवस ग्रामपंचायात बंद होती तसेच ग्रामपंचायातमध्ये सरपंचासह गमपंचायत सदस्य, कर्मचारीही कोरोना पॉझीटीव्ह निघाल्यामुळे व वाढत्या पॉझीटीव रुग्णामुळे घबराहाट होत आहे म्हणून तीन दिवस बंदचा निर्णय सर्व व्यापा-यानी घेतला आहे.