किल्लारी : वार्ताहर
येथील रावसाहेब पाटील अॅग्रो प्रोडयुसर कंपनी किल्लारी येथील नाफेड व महा एफ.पी.सी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सर्व पत्रकारांच्या हस्ते दि.१४ मार्च २०२३ रोजी खरेदी केंद्राचे उद्घाटन पत्रकारांच्या हस्ते करण्यात आले. जेष्ठ पत्रकार सूर्यकांत बाळापुरे, सतीष सरतापे, महेश उस्तुरे, कलीम शहा, विश्वनाथ गुंजूटे, वैजिनाथ कांबळे व रावसाहेब पाटील प्रोड्यूसर कंपनीचे चेअरमन दिपक पाटील यांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करून शेतक-यांच्या मालाची पूजा करण्यात आली.
या भागात हरभरा या पिकाचे उत्पन्न अधिक होत असल्याने तरुण शेतकरी दिपक पाटील यांनी हमी भाव केद्र सुरू केले आहे. यामुळे परिसरातील शेतक-यांना हमी भाव मिळत असल्याचे रावसाहेब पाटील यांनी सांगितले.. या कार्यक्रमासाठी शेतकरी बाळासाहेब खजुरे, बिसर ठाकूर, माजी सैनिक अलबक्ष मोमीन, विजय बिराजदार, श्रीनिवास देशमुख, उध्दव जोडवे, बस्वराज गावकरे, सिद्धेश्वर बिराजदार, चंद्रभान जाधव, युवराज वाळके, हरिदास भोसले, संभाजी बाबळसुरे, रामेश्वर बाळापुरे आदी शेतकरी उपस्थित होते. हंगाम २०२२-२३ किमान आधारभूतकिंमत खरेदी योजेनेंतर्गत हरभरा ऑनलाईन नोंदणी सुरु आहे. यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, ८/अ, ७/१२ उतारा मोबाईल नंबर तसेच उता-यावर तलाठी ई-पिक पहाणी सन २०२२-२३ असने आवश्यक आहे. नाव नोंदणी संपर्क चेअरमन दिपक पाटील-९४२३७१९२२६, रामेश्वर बाळापुरे-८६०५५५८५५०, बालाजी क्षीरसागर- ९४०३२४७९६०, अजित बाबळसुरे- ८१८०८९०१८९ , व्यंकट कुंभार -९०२८१७९०९४ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन रावसाहेब पाटील अॅग्रो प्रोडयुसर कंपनी तर्फे करण्यात आले आहे.