22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeलातूरकेंद्रातील भाजप सरकारविरोधात युवकांचा आवाज उठणार

केंद्रातील भाजप सरकारविरोधात युवकांचा आवाज उठणार

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने देशातील युवकांचा आवाज दाबण्याचे काम केले आहे. केंद्र सरकारच्या या कुटील राजकारणाविरुद्ध देशातील युवकांना ‘यंग इंडिया के बोल सीझन-२’च्या माध्यमातून विचारमंच निर्माण करुन दिले जात आहे. जिल्हा ते राष्ट्रीय पातळीपर्यंत ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेच्या मध्यमातून केंद्रातील भाजपविरुद्ध संपूर्ण देशभर युवकांचा आवाज उठणार आहे, असे युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते जयेश गुरनानी यांनी शनिवारी येथील काँग्रेसभवनात पत्रकारांशी संवाद साधताना सांगीतले.

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खासदार राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभर ‘यंग इंडिया के बोल सीझन-२’चे लाँचिंग झाले आहे, असे नमुद करुन जयेश गुरनानी म्हणाले, तरुणांचा आवाज बुलंद करण्यासाठी राष्ट्रीय युवक काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने ‘यंग इंडिया के बोल सीझन-२’ हे स्पर्धात्मक अभियान राबविण्यात येत आहे. देशातील युवकांना अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्याचा मंच निर्माण करुन देण्यासाठी देशभर हे अभियान सुरु झाले आहे. सध्या देशात बेरोजगारी व महागाईचे प्रचंड मोठे संकट उभे राहिले आहे. युवकांचा आवाज दाबण्याचे काम केंद्रातील भाजप सरकार करीत आहे. म्हणुन युवकांचा आवाज बुलंद करण्यासाठी काँग्रेसचे नेते राहूल गांधी, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी कृष्णा आल्लावरु, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवासन, महाराष्ट्र प्रदेश युवक काँगेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ‘यंग इंडिया के बोल सीझन-२’ अभियानचे लाँचिंग करण्यात आले.

या माध्यमातून जिल्हास्तरीय स्पर्धेतून पाच स्पर्धक निवडले जातील. त्यात १ अनुसूचित जाती, १ महिला व इतर ३ स्पर्धकांचा समावेश असेल. राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील पाच विजेते स्पर्धक सहभागी होतील. त्यातून पाचजणांची निवड होईल व ते पाचजण राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होतील. या स्पर्धेतून पाच किंवा दहा स्पर्धकांची निवड होईल व या स्पर्धकांना युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदाचा पदभार दिला जाणार आहे, असे जयेश गुरनानी म्हणाले. केंद्रातील भाजपचे चुकीचे धोरण याविषयावर काम करण्यासाठी युवकांना संधी दिली जाणार आहे. मुख्यत: ज्या युवकांचे विचार काँग्रेस पक्षाशी व पक्षाच्या विचारधारेशी आणि केंद्रातील चुकीच्या धोरणाविरुद्ध आहेत, अशा युवकांना ‘यंग इंडिया के बोल सीझन-२’ मध्ये सहभाग नोंदविता येणार आहे. लातूर जिल्ह्यातील अधिकाधिक युवकांनी ‘यंग इंडिया के बोल सीझन-२’ मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही जयेश गुरनानी यांनी केले आहे.

या पत्रकार परिषदेस युवक काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते हणमंत पवार, दीपक राठोड, लातूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान सय्यद, सोशल मिडीया सेलचे व्यंकटेश पुरी, प्रविण सूर्यवंशी, अ‍ॅड. देविदास बोरुळे-पाटील यांची उपस्थिती होती. उपस्थित पाहूण्यांचे स्वागत अकबर माडजे, जगदेव मोहिते, शिवाजी देशमुख, सुनिल काळे, शहेबाजखा पठाण, बालाजी झिपरे, अभिजीत इगे, सागर मुसांडे, योगेश शेळके यांनी केले. प्रास्ताविक हणमंत पवार यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या