25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeलातूरकेंद्र सरकारच्या महागाईच्या धोरणाविरोधात आज काँग्रेसचे आंदोलन

केंद्र सरकारच्या महागाईच्या धोरणाविरोधात आज काँग्रेसचे आंदोलन

एकमत ऑनलाईन

लातूर : केंद्रातील भाजपा सरकारच्या महागाईच्या धोरणाविरोधात लातूर जिल्हा काँग्रेस आणि लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता काँग्रेस भवन परिसरात आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्रातील भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशामध्ये दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. पेट्रोल, डीझेल, घरगूती गॅसचे वाढलेले दर आणि जीवनावश्यक वस्तूंवर वाढलेल्या जी. एस. टी मुळे सामान्य माणसाचे जगणे मुश्कील झाले आहे. केंद्रसरकारने देशातील युवकांचे भविष्याचा कोणताही विचार न करता, घाईघाईत चालू केलेल्या भारतीय सैन्य दलातील अग्निपथ योजनेमुळे देशातील युवकांचे भविष्य धोक्यात आले आहे.

या सर्व बाबींचा व केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेवरुन प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोेलन होणार आहे. तरी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य, सर्व आघाडीचे प्रमुख, सेल व विभाग यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या