लातूर : प्रतिनिधी
श्री केशवराज माध्यमिक विद्यालय, लातूर येथील विद्यार्थ्यांनी शालांत प्रमाणपत्र परीक्षेत यशाची उत्तुंग भरारी घेतली आहे. या परीक्षेला ६५३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ६५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल ९९.४० टक्के लागला आहे. यात ९० टक्के पेक्षा अधिक गुण घेणारे विद्यार्थी २०८ तर ९५ टक्के पेक्षा अधिक गुण घेणारे विद्यार्थी ८० व १०० टक्के गुण घेणारे विद्यार्थी ११ आहेत. यात पिसाळ वैष्णवी, माने निहारिका, केंद्रे संकेत, मोरे स्वप्निल, पाटील मानसी, बेंबङे वैभव, मोटेगावकर कैवल्य, पांडे आस्था, रेणापूरकर केतन, वडूळकर प्रणव, वाघमारे सिद्धी यांचा समावेश आहे.
श्री केशवराज विद्यालयाने उतुंग यशाची परंपरा कायम राखली आहे. दहावीच्या वर्गाचे वर्षारंभीच केलेले वर्षभराचे नियोजन, वर्षभर सायंकाळचे जादा तास, निवडक विद्यार्थीनां जुलैपासूनच तज्ज्ज्ञ विषय शिक्षकांचे मिळालेले मार्गदर्शन व समुपदेशन, वर्षभरात झालेल्या परीक्षा, रात्र अभ्यासिका अशा सर्व उपक्रमांचे फलित म्हणजे हा निकाल होय.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलूरकर, उपाध्यक्ष जितेश चापसी, डॉ. हेमंत वैद्य, प्रवीण सरदेशमुख, संजय गुरव, धनंजय तुंगीकर, शैलेश कुलकर्णी, गंगाधर खेडकर, मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी, उपमुख्याध्यापक महेश कस्तुरे, पर्यवेक्षक संदीप देशमुख, बबन गायकवाड, दिलीपराव चव्हाण, अंजली निर्मळे, प्रदीप कटके, शुभांगी रुईकर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.