26.9 C
Latur
Sunday, May 29, 2022
Homeलातूरकोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील कलाकारांनी अर्थसहाय्याचा लाभ घ्यावा

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील कलाकारांनी अर्थसहाय्याचा लाभ घ्यावा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील कोरोना कालावधीमध्ये जे कलाकार सादरीकरण व त्यातून होणारे उत्पन्न या बाबीपासून वंचित राहीले होते. त्यांची अर्थिक कुचंबना होऊ नये म्हणून पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून राज्यातील कलाकारांना कोरोना पार्श्वभुमीवर एकरकमी प्रति कलाकार रुपये ५ हजार अनुदान देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व पात्र कलावंतानी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.

यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली असुन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. तेंव्हा या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पात्र कलाकार यांनी तालुक्याचे तहसील कार्यालयात विहित नमुन्यात अर्जासोबत राज्यातील रहीवासी पुरावा, कलाक्षेत्रात १५ वर्ष कार्यरत असलेले पुरावे, आधार कार्ड व बँक खात्याचा तपशील, तहसीलदाराचे उत्पन्नाचा दाखला ४८ हजाराच्या कमाल मर्यादेत, शिधापत्रिका सत्यप्रत ही कागदपत्रे सोबत जोडावीत. दि. ३१ जानेवारी २०२२ पर्यंत सादर करावे.

केंद्र व राज्य शासनाच्या वृध्द कलावंत मानधन योजनेतून मानधन घेणारा लाभार्थी कलाकार तसेच इतर वैयक्तिक शासकीय अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेणा-या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. अधिक माहितीसाठी तालुक्याचे तहसील कार्यालय येथे संपर्क साधावा असेही पत्रकात नमूद केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या