29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeलातूरकोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्राला उतरती कळा

कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्राला उतरती कळा

एकमत ऑनलाईन

अहमदपूर : रविकांत क्षेत्रपाळे
शैक्षणिक पंढरी म्हणून राज्यात नावारूपाला आलेल्या अहमदपूर शहरातील शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी संख्येला घरघर लागली असून येथील किमान चार ते पाच हजार विद्यार्थी संख्या कमी झाली असून याचा फटका अनेक शाळा-महाविद्यालयांना बसला आहे. यामुळे येथील तुकड्या कमी होऊन शिक्षकांना या तुकडीबरोबर अन्य ठिकाणी जावे लागणार आहे. येथील शैक्षणिक गुणवत्ताही संपुष्टात आली असून कोरोना या आजारामुळे शहराचे शैक्षणिक वैभव नष्ट झाले आहे.

अहमदपूर शहरी शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्रामध्ये नंबर एक क्रमांकावर होते. येथील शाळा- कॉलेज शाळा-कॉलेज यांचे वर्चस्व जवळपास पंधरा ते वीस वर्ष होते. यामुळे अमदपूर शहराच्या वैभवात भर पडली होती. शिक्षणामुळे घरांची बांधकामे वाढलेली आहेत. शहरात अन्य जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसोबत कोट्यवधी रुपये या शहरात वर्षाकाठी येत होती. यामुळे शहर झपाट्याने वाढले. येथील व्यापारही वाढला.

शहरातील कापड दुकाने, जनरल स्टोअर्स, सायकल दुकाने, हॉटेल्स, किराणा व्यापार ,केस कर्तनालय, फळ दुकाने, फारच जोमात होती चांगल्या शिक्षणामुळे येथे राज्यातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी पहिलीपासून ते बारावीपर्यंत येत होती. येथे जवळपास दहा ते बारा हजार विद्यार्थी बाहेर गावची येथे शहरात राहून शिक्षण घेत होते.

सध्या येथील शाळा-महाविद्यालयांमधील शैक्षणिक गुणवत्ता कमी झाल्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना येथून टी.सी काढून लातूर-नांदेड व गावाकडे घेऊन गेले आहेत. कोरोनामुळे ही शिक्षणावर गंडांतर आले आहे. येथील शाळा- महाविद्यालयांतील संख्या कमालीची कमी झाली आहे. शहरात इंग्रजी शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा, उर्दू शाळा, मराठी माध्यमाच्या खाजगी प्राथमिक, माध्यमिक शाळा अशा एकूण जवळपास ४५ ते ५0 शाळांची संख्या आहे. येथील विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे तुकड्यांची ही संख्या त्याप्रमाणे वाढली आहे. शिक्षण विभागाने तुकड्यांना मान्यताही दिली परंतु येथील गुणवत्ता कमी झाल्यामुळे व कोरोनाच्या भीतीमुळे येथील संख्याही झपाट्याने कमी झाली आहे.

शहरात दर्जेदार व गुणवत्तेच्या शिक्षणामुळे येथे किमान शंभर ते सव्वाशे वस्तीगृह सुरू होते. येथील वस्तीगृहात लातूर जिल्ह्यासह बीड, नांदेड ,परभणी, वाशिम, ंिहगोली, उस्मानाबाद या जिल्ह्यातील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी राहत होते. एका-एका वस्तीगृहात ५० पासून ते १५० विद्यार्थी राहून शिक्षण घेत होते. या वस्तीगृहावरही गडांतर आले आहे. कोरोनामुळे आता अहमदपूर शहराकडे विद्यार्थ्यांसह पालकांनी पाठ फिरवली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या