22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeलातूरकोरोना एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आवश्यक

कोरोना एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आवश्यक

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
कोरोना महामारीमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाखाच्यावर महिला एकल (विधवा) झालेल्या आहेत. या महिलांना केंद्र सरकार, राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन महत्त्वपूर्ण पद्धतीने सहकार्य करीत आहे परंतु कोरोना एकल महिलांना कौटुंबिक मानसिक आधार सोबत व्यावसायिकदृष्ट्या आर्थिक स्वावलंबी बनवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ लातूर होरायजनचे अध्यक्ष डॉ. संजय गवई यांनी व्यक्त केले.

कोरोना एकल पुनर्वसन समिती, महाराष्ट्र, जिल्हा लातूर, ग्रा. प. कार्यालय, वलांडी ता. देवणी आणि रोटरी क्लब ऑफ लातूर होरायजन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक विधवा दिनाचे औचित्य साधून कोरोना एकल महिलांना शिलाई मशीन वाटप कार्यक्रम ग्रामपंचायत सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता यामध्ये ते मार्गदर्शन करतांना बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच राणीताई भंडारे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड.सुजाता माने, तालुका समन्वयक वरुणराज सूर्यवंशी आणि ग्राम विकास अधिकारी व्ही. एस. केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

पुढे बोलताना डॉ. संजय गवई म्हणाले की, आपल्या पतीचा कोरोनामध्ये मृत्यू झाला याचे नैराश्य बाजूला सारुन कुटुंबाच्या आर्थिक स्वावलंबनाची जबाबदारी शिलाई मशीन व्यवसायाच्या माध्यमातून आपण उचलली पाहिजे त्यासाठी आपण प्रशिक्षित झाले पाहिजे असेही ते म्हणाले. अ‍ॅड. सुजाता माने म्हणाल्या की, महिलांना मानसिकदृष्ट्या आधार देऊन शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेण्यासाठी आपण सर्वांनी तत्पर राहिले पाहिजे असे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमामध्ये रंजना विकास कांबळे (चवनहिप्परगा), सुमन विनायक धामणगावे (लासोना) सरस्वती रमेश भालके (नेकनाळ), अनुराधा बलवान वाघमारे (जवळगा) आणि ललीता जाधव (इंद्राळ) यांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले तसेच एकल महिला कुटुंबातील हिना बौडीवाले आणि गणेश धामणगावे यांनी प्रत्येकी दहावीमध्ये ८३ टक्के गुण तर बारावीमध्ये ७० टक्के गुण संपादित केल्यामुळे त्यांचाही सत्कार करण्यात आला. अध्यक्ष समारोप करताना सरपंच राणीताई भंडारे यांनी केला. सूत्रसंचालन हर्षदा जाधव हिने केले तर प्रास्ताविक व आभार वरुणराज सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भोसले, महादेवी पाटील, गंगाधर विभूते, इस्माईल शेख आणि विजयमाला यांनी सहकार्य केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या