लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात अवैध रीतीने हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री करणा-यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले होते. त्या अनुषंगाने उदगीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक पवार यांच्या नेतृत्वाखाली कौळखेड येथे अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करणारे व्यक्तीवर पोलिस ठाणे उदगीर ग्रामीणच्या पथकाने सकाळी छापामारी केली.
यामध्ये ८४० लिटर रसायन, साहित्य, हातभट्टीची दारू असे ५२ हजार रुपयेचे रसायन, हातभट्टीदारू आणि हातभट्टी निर्मितीचे साहित्य नाश करण्यात आले आहे. या कार्यवाहीत नितीन नामदेव चव्हाण २९, सुरज बाळू राठोड २० वर्ष दोघे रा. कौळखेड ता. उदगीर यांच्यावर उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलिस ठाणे उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वातील पथक मधील पोउपनि तानाजी चेरले, पोलिस अंमलदार शिवप्रताप रंगवाळ, राम बनसोडे, गोविंद बरूरे, राहुल गायकवाड, सचिन नाडागुडे, स्वाती अतकरे यांनी केली आहे.