21.9 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeलातूरक्रांतीदिनापासून स्वातंत्र्यदिनापर्यंत मुस्लिम समाज साजरा करणार जश्न-ए-आजादी

क्रांतीदिनापासून स्वातंत्र्यदिनापर्यंत मुस्लिम समाज साजरा करणार जश्न-ए-आजादी

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त क्रांतीदिनापासून स्वातंत्र्य दिनापर्यंत मुस्लिम समाजाच्या वतीने जश्न-ए-आजादी सप्ताह साजरा करण्याचा निर्णय येथील पत्रकार भवन येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या सप्ताहात विविध कार्यक्रमांसह उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
मुफ्ती सय्यद फहिमोद्दीन मजाहीरी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. प्रास्ताविक जश्न-ए-आजादी समारोहाचे मुख्य संयोजन एन. ए. इनामदार यांनी केले. जश्न-ए-आजादी ९ ऑगस्ट क्रांतीदिनापासून ते १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनापर्यंत सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी शेख उस्मान गुरूजी, मुफ्ती अब्दुल करीम, मौलाना शरीफ खान, हाजी शेख जानी, फसीयोद्दीन सिद्धीकी, मोहसीन खान, शेख मुख्तार इंजिनिअर यांनी सखोल असे मार्गदर्शन केले.

जश्न-ए-आजादी साजरा करीत असतांना तीन दिवसीय व्याख्यानमाला, राष्ट्रीय एकात्मतेवर मुशायरा, कवी सम्मेलन, जाहिर सभा आणि मुख्य रॅली काढण्याचे ठरले. ज्यामध्ये सर्व शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, मुलं-मुली, शिक्षक-शिक्षीका, मदरशाचे विद्यार्थी, मौलानांसह सर्व जनतेला सहभागी करुन घेण्याच्या दृष्टीने विविध उप समित्याही निर्माण करण्यात आल्या. या संयोजन समितीमध्ये मुफ्ती अब्दुल करीम, मौलाना शरीफ खान, मुफ्ती सय्यद वसीम, मुफ्ती सय्यद फहिमोद्दीन मजाहिरी, मोहसीन खान, सय्यद तजम्मुल इंजिनिअर, शेख मुख्तार इंजिनिअर, सलीम गोलंदाज, शेख उस्मान गुरुजी, महेबुब भोयरेकर, दादामिया तांबोळी, सय्यद जहिर, गौस पत्रकार, फय्याज तांबोळी, फसियोद्दीन सिद्धीकी, शेख मैनोद्दीन, हाजी शेख जानी यांचा समावेश असल्याचे मुख्य संयोजक एन. ए. इनामदार यांनी सांगीतले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या