लातूर : ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदर बॅरिस्टर असदोद्दीन ओवेसी यांची मंगळवार दि. ७ जून रोजी शहरातील ताजोद्दिबाबा रोडवर सभा आयोजित करण्यात आली आहे. सद्या देशात बेरोजगारी, महागाई , सरकारी अस्थपनांचे होत असलेले खासगीकरण यांसारखे प्रश्न गंभीर बनले आहेत. यासारख्या प्रश्नांची सोडवणूक करणे गरजेचे असताना काही लोक सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम करत आहेत. त्यामुळे सामाजिक सलोखा अबाधित ठेवत काम करणे गरजेचे आहे. त्या उद्देशाने खासदार ओवेसी यांची सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती एमआयएमचे लातूर जिल्हाध्यक्ष अॅड. मोहंमदअली शेख यांनी दिली.