उदगीर : तालुक्यातील काशीराम तांडा येथील आपल्या शेतीतील ंिलबाच्या झाडाला शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे काशीराम तांडा (ता. उदगीर) येथील संगीता गंगाराम चव्हाण (वय-३५) व तिची मुलगी अंजली गंगाराम चव्हाण (वय-१३) या दोघींनी शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शेतातील ंिलंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत रात्री उशिरा वैजनाथ तुकाराम राठोड (वय- ६५) रा.टिकाराम तांडा यांनी पोलिस ठाण्यास माहिती दिली.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल जॉन बेन यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, दिपककुमार वाघमारे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक भोळ, पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले, डीबी शाखेचे तुळशीदास बरूरे, राहुल गायकवाड, रामभाऊ सनसोडे, राहुल नागरगोजे, सचिन नाडागुडे यांनी रात्री घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली असता त्यांना तेथे ंिलबाच्या झाडाला गळफास लावलेले मृतदेह दिसून आले व एक छोटी मुलगी तेथे रडत असल्याचे दिसून आले. या मुलीच्या गळ्याला ही इजा झाल्याचे दिसून आले व झाडालाही तुटकी दोरो लोबकाळत असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यामुळे या मुलीलाही गळफास लावण्यात आल्याचे पोलिसांना लक्षात आले ही नेमकी घटना कशामुळे घडली, आत्महत्या आहे की हत्या आहे गळफास लावण्यात आला की स्वत:हून आत्महत्या केली याबाबतचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.