27.7 C
Latur
Thursday, February 2, 2023
Homeलातूरगांजाची वाहतूक करणा-या तिघांना १० वर्षे कारावास

गांजाची वाहतूक करणा-या तिघांना १० वर्षे कारावास

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
गांजाची चोरटी विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने गांजाची वाहतूक करणा-या तीघांना वाढवणा पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी उदगीर येथील अतिरिक्त, विशेष सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याच्या आधारे तीन आरोपींना १० वर्ष कारावास व प्रत्येकी १ लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे.

पोलीस ठाणे वाढवणा हद्दीत २०२० मध्ये गांजाची चोरटी विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने गांजाची वाहतूक करीत असताना तीन आरोपींना १७६ किलो गांजा व बोलेरो जीपसह वाढवणा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी सापळा लावून पकडले होते. या प्रककरणी वाढवाणा पोलिस पोलीस ठाण्यात राहुल नीलकंठ पवार, शिरीष रघुनाथ जाधव, सोमनाथ शिवाजी जाधव सर्व रा. माळेगावतांडा ता. औराद बर्हाळी, जि. बिदर राज्य कर्नाटक यांचे विरुद्ध गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाढवणा पोलीस स्टेशनचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांनी सदर गुन्ह्याचा प्राथमिक पंचनामा व तपास केला. पोलीस निरीक्षक सोंडारे यांनी पुढील तपास करून नमूद गुन्ह्यातील आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध भरपूर परिस्थितीजन्य व भौतिक पुरावे गोळा करून दोषारोपपत्र न्यायालयात मुदतीत दाखल करण्यात आले.

गुन्ह्यातील इतर साक्षीदारांची व सदर गुन्ह्याचा पंचनामा करणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. दोषारोपपत्रा सोबत दाखल करण्यात आलेली परिस्थितीजन्य व भौतिक पुराव्यावरून न्यायालयाने गुन्ह्यातील तीन आरोपींना १० वर्षं करावास व प्रत्येकी एक लाख रुपयाचे दंडाची शिक्षा सुनावली आहे. सदरची कामगिरी देवणी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोन्डारे, तत्कालीन वाढवना प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळासाहेब नरवटे, वाढवणा पोलीस स्टेशनचे सध्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण, सहाय्यक सरकारी अभियोक्ता सय्यद, पोलीस अंमलदार साळुंखे, माळवदे, नितीन बेंबडे, सूर्यकर, अक्केमोड यांनी परिश्रम घेतले आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या