26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeलातूरगांजा, ३ लाख १० हजारांच्या मुद्देमालासह दोघांना अटक

गांजा, ३ लाख १० हजारांच्या मुद्देमालासह दोघांना अटक

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
अखिल भारतीय अकाली सेना संघटनेच्या जिल्हाध्यक्षसह एकाला प्रतिबंधित गांजासह ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमालसह अटक करण्यात आली. सदर कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या नेतृत्वात झाली. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन कारवाई करण्याची मोहीम राबवित येत आहे. लातूर शहरातील क्वॉईल नगरमधील काही इसम प्रतिबंधित गांजाची चोरटी विक्री व्यवसाय करीत आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर माहितीची शहनिशा करुन सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांचे नेतृत्वात शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील यांनी पोलिस पथकातील अधिकारी व अमलदारांसह गोपनीय माहिती प्रमाणे क्वॉइल नगरमधील एका घरावर छापा मारला.

तेथे चोरटी विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला गांजा बाळगलेले इसम आढळून आले. त्यांच्याकडून १५५ ग्रॅम गांजा तसेच रोख रक्कम ३ लाख ९ हजार ३५० रुपये इतकी रक्कम मिळून आली नमूद रक्कम व गांजा जप्त करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत कुदळे यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे प्रतिबंधित गांजाची अवैद्य साठवणूक करून विक्री व्यवसाय करणारे शरीफ लतीफ शेख वय ३४ वर्ष, राहणार क्वॉईलनगर, जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय अकाली सेना व गणेश विभीषण बनसोडे, वय १९ धंदा मजुरी, राहणार कॉइलनगर लातूर यांच्यावर पोलीस ठाणे शिवाजीन्ांगर पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या