24.7 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeलातूरगावांतील व्यवसायांना ही भरावा लागणार कर

गावांतील व्यवसायांना ही भरावा लागणार कर

एकमत ऑनलाईन

शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
ग्रामीण भागातील मोबाईल टॉवर, ३३ केव्ही सब स्टेशन यांसह गावातील विविध व्यवसायांना ही कर भरावा लागणार आहे. ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी या कराच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध होणार असल्याने ग्रामपंचायतीना गावांतर्गत कामे करण्यासाठी या कराची मोठी मदत होणार आहे.

आजÞादी का अमृत महोत्सव अंतर्गत ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद प्रयत्न करीत असून कायद्यातच कर आकारणीची तरतूद असली तरी ग्रामपंचायतींकडून त्याची आकारणी होत नव्हती. चालू आर्थिक वर्षापासून या नव्या करासह करवसुलीची मागणी निश्चीत करण्याचे आदेश त्यांनी दिले असून गावच्या हद्दीतील मोठ्या व्यवसायापासून गावातील पानटपरी चालकांनाही दर महिना हा व्यवसाय कर भरावा लागणार आहे.

दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी ग्रामपंचायतींना आत्मनिर्भर करण्याचा विडा उचलला असून आता यापुढे गावाच्या हद्दीतील सर्व व्यवसायांना ग्रामपंचायतीचा कर लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे आता घरपट्टी व नळपट्टी यांसह मोबाईल टॉवर, ३३ केव्ही सब स्टेशन, हॉटेल, ढाबा, बार यांसह अन्य व्यवसायांनाही ग्रामपंचायतीला कर भरणा करावा लागणार असून या संदर्भातील वसुली करण्याचे आदेश पं.स.
गटविकास अधिका-याना देण्यात आले आहे.

सध्या ग्रामपंचायतींना घरपट्टी व नळपट्टीच्या कराचेच उत्पन्न असते. त्यात ही ग्रामीण भागात कराचा भरणा करण्याची मानसिकता नसल्याने खर्चासाठी ग्रामपंचायतींना अडचण येत होती. त्यांना सरकारी अनुदानावरच विसंबून राहावे लागत होते. मात्र आता व्यवसाय व उद्योगांचा शोध घेऊन त्यांच्यावर कराची आकारणी निश्चीत होवून या व्यवसाय करातून ग्रामपंचायतींना लॉटरी लागणार असून उत्पन्न वाढून ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार असल्याचे गटविकास अधिकारी बी.टी. चव्हाण यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या