24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeलातूरग्रामपंचायत भ्रष्टाचार चौकशीदरम्यान धक्काबुक्की

ग्रामपंचायत भ्रष्टाचार चौकशीदरम्यान धक्काबुक्की

एकमत ऑनलाईन

लातूर : औसा तालुक्यातील बुधोडा ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीदरम्यान ७० ते ८० जणांच्या जमावाने शिवीगाळ करुन धक्काबुक्की केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य बालाजी नारायण मिठापल्ले व विजयकुमार भुते यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

बुधोडा येथे दि. १४ जून रोजी दुपारी १२.३५ वाजल्यापासून ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागील रस्त्याच्या कामासह इतर विविध विकास कामांची चौकशी गटविकास अधिकारी कार्यालयाकडून करण्यात येत आली. त्यावेळी बालाजी नारायण मिठापल्ले व विजयकुमार हरिबा भूते यांनी गावातील काही लोकांचे गैरकृत्य संबंधीत अधिका-यांसमोर मांडत असताना ७० ते ८० जणांचा जमाव जमवून शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. गावातील काही लोकांकडून आम्हाला आमच्या कुटूंबियांना धोका आहे. धमक्यांमुळे आम्ही भयभीत झालो आहोत. त्याबाब योग्य ती कार्यवाही करावी, असेही बालाजी मिठापल्ले व विजयकुमार भूते यांनी निवेदनात नमुद केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या