लातूर : येथील अंबाजोगाई रोडवरील स्टेट बँक ऑफ हैदराबाद कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या परिसरात ग्रीन बेल्ट आहे. पण या ग्रीन बेल्टवर अनेक दिवसांपासून एक पिठाची गिरणी आणि काही घरे बांधण्यात आली होती. ती महानगरपालिका आयुक्त अमन मित्तल यांनी काढली .
ग्रीन बेल्टवरील अतिक्रमण वारंवार सांगुनही काढले जात नव्हते. त्यामुळे दि. ५ जुलै रोजी महानगरपालिका आयुक्त अमन मित्तल यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण काढण्यात आले. या ग्रीन बेल्टवर एक पिठाची गिरणी व तीन, चार घरेही होती. हे अतिक्रमण काढावे, असे वारंवार सांगण्यात आले. परंतू, ते काढले जात नव्हते. आयुक्तांनी स्वत: उपस्थित राहून अतिक्रमण काढले. जेसीबीच्या साह्याने हे सर्व अतिक्रमण काढण्यात आले. पिठाच्या गिरणीवरही जेसीबी फिरविण्यात आला. सुरुवातीला येथील नागरिकांनी विरोध केला पण महानगरपालिकेने सर्व अतिक्रण काढून टाकले.