उदगीर : प्रतिनिधी
घरगुती कारणावरुन झालेल्या वादात एकाने चाकूने हल्ला करुन जखमी केल्याची घटना गंडी पाटी उदगीर येथे घडली आहे. राम बळीराम कासले वय ५१ रा उजना तालुका अहमदपूर यांना व साक्षीदारास घरगुती कारणावरुन आरोपी राजकुमार चिलोडे रा. पानगाव ता रेणापूर याने चाकूने हल्ला करुन जखमी केले. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरुन उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलिस कॉन्स्टेबल सिरसे हे करीत आहेत.
घरगुती कारणावरुन चाकूने हल्ला
एकमत ऑनलाईन