22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरघरफोडीतील दागिण्यांसह सात लाखांचा मुद्देमाल परत

घरफोडीतील दागिण्यांसह सात लाखांचा मुद्देमाल परत

एकमत ऑनलाईन

निलंगा: औराद शहाजानी येथील पोलिसांकडून घरफोडीतील आरोपींनी चोरलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण ७ लाख २६ हजारांचा मुद्देमाल फिर्यादीला परत देण्यात आला आहे. दि. २३ जुलै २०२२ ते दि२५ जुलै २०२२ दरम्यान पोलीस ठाणे औराद शहाजनी हद्दीतील बालाजी मंदिर परिसरातील एका घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ७ लाख २६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक नेमून गोपनीय माहितीच्या आधारावरून आरोपी बबलू उर्फ अमजद रजा शकील बेलोरे, (वय २०), सोहेल तैमूर पटेल, (वय २१) इम्रान खलीलमियां कासार बेलूरे (वय १९) सर्व राहणार सिंधी गल्ली, औराद शहाजानी ता. निलंगा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केले असता आरोपींनी गुन्हा कबूल केला व दागिने रोख रक्कम असे एकूण ७ लाख २५ हजार रुपये जप्त केले. सदरील जप्त केलेला मुद्देमाल अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी निलंगा दिनेश कुमार कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कामत यांच्या उपस्थीतीत पोलीस ठाणे औराद शहाजानी येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात संबधित फिर्यादीस परत देण्यात आला.चोरीस गेलाल माल पुन्हा मिळाल्याने नागरीकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या