26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeलातूरघरास आग लागून साहित्य,चार शेळ्या, म्हैस जळून खाक

घरास आग लागून साहित्य,चार शेळ्या, म्हैस जळून खाक

एकमत ऑनलाईन

रेणापूर : रेणापूर नगरपंचायत द्ददीतील काळेवाडी येथे एका घराला आग लागून घरातील सर्व साहत्यि, अन्नधान्य, कपडे, दैनंदिन वापरातील वस्तू , चार शेळ्या, चार पिल्ले व एक म्हैस जळून खाक झाल्याची घटना शुकवारी (दि.१८ नोव्हेंबर ) दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली . या आगीत अंदाजे १ लाख ५० रुपयापेक्षा अधिक नुकसान झाले. रेणापूर नगरपंचायत हद्दीतील काळेवाडी येथील शोभाबाई तात्याराव गायकवाड यांच्या घराला शुक्रवारी (दि.१८ ) दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास अचानकपणे आग लागली या भिषण आगीत घरातील सर्व साहित्य, अन्नधान्य, कपडे, दैनंदिन वापरातील वस्तू ,याच्यासह चार शेळ्या व त्यांची चार पिल्ले , एक म्हैशीचा होरपळून मृत्यू झाला.

सदर घटनेची माहिती मिळताच तलाठी गोंविंद शिंगडे, नगरपंचायतीचे विशाल विभुते यांनी काळेवाडी येथे घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या आगीत अंदाजे १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. संबंधीत शोभाबाई गायकवाड यांना शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी लातुर ग्रामीण युवक कॉग्रेसचे उपाध्यक्ष प्रदिप काळे, पोलीस पाटील अशोक काळे, राजु गडगळे, यांच्यासह ग्रामस्थानी केली आहे. दरम्यान ग्रामस्थ व तलाठ्याकडून १० हजारांची मदत जळीतग्रस्त कुटुंबास रेणापूरचे तलाठी, ग्रामसेवक प्रकाश काळे व ग्रामस्थांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या