लातूर : प्रतिनिधी
शेतकरी, शेतमजूर सर्वसामान्य माणसासाठी संघर्ष करणा-या चळवळी असल्याच पाहिजे. त्या टिकल्या पाहिजेत तुम्ही आम्हीं एका नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि याच माध्यमातून शेतक-यांचे प्रश्न असो की सामान्य नागरिकांचे असो ते सोडवण्यासाठी चळवळीतील कार्यकर्ता हा दुवा म्हणुन महत्वाचा घटक आहे. हे टिकवण्यासाठी यांना बळ देणे गरजेचे असून यासाठी लोकनेते विलासराव देशमुख, माजी केंद्रिय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी जिल्ह्यांत विकासाचा पाया रचला त्याच धर्तीवर आम्ही व माजी मंत्री आमदार अमित देशमुख कार्य करीत आहोत. शेतक-यांना न्याय देण्याबरोबर चळवळी टिकल्या पाहिजेत अशीच भूमिका आमची राहिलेली आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले.
औसा येथे शेतकरी नेते राजेंद्र मोरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने यांच्यासह सप्तरत्नांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानचे सहअध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर, महंत राजेंद्र गिरी महाराज, राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील उपस्थित होते. यावेळी सत्कार मुर्ती शेतकरी नेते राजेंद्र मोरे, राजकुमार पल्लोड, मुकेश जाधव, डॉ ए. टी अरब, डॉ. राचमाले, अँड मुक्तेश्वर वागदरे, धनंजय भोसले, राजू पाटील या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणा-या सप्तरंगाचा गौरव करण्यात आला यावेळी औसेकर महाराज यांनी शेतकरी नेते राजेंद्र मोरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देवुन आपल्या वाढदिवसाला माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची उपस्थिती हीच तुमच्या आयुष्यातील कार्याची पावती आहे असे सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास माजी आमदार अँड. त्रिंबक भिसे, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन श्रीपतराव काकडे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, मारूती ममहाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शाम भोसले, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, नारायण लोखंडे, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपत बाजुळगे, सत्तार पटेल, अरुण कुलकर्णी, काँग्रेस मिडिया जिल्हाध्यक्ष हरिराम कुलकर्णी, पृथ्वीराज शिरसाठ, संभाजी सूळ, सचिन दाताळ, सतीश पाटील, नारायण नरखेडकर, अँड सचिन ढवण, दगडु बर्डे, पी सी पाटील, नवनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते राजीव कसबे यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन पी. सी. पाटील विवेक सौताडेकर यांनी केले.