निलंगा : वडिलाच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मिळाल्याचा राग मनात धरून चार चाकी वाहन अंगावर घालून एकास ठार केल्याची घटना दि ३० रोजी घडली असून एक गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर लातूर येथील रूग्णालयात उपचार सुरूआहेत. ही घटना निलंगा ते शिंदखेड रोडवर घडली. या प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात कलम ३०२, ३०७,१४३,१४७, १४८, २४९, ५०६ भादवी प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ यांनी सांगितले.
निलंगा तालुक्यातील येळणूर येथील आकाश सोळुंके याने दाखल केलेल्या खुनाच्या गुन्ह्यात यातील जखमी व मयतांना जामीन मंजूर झाल्याचा राग मनात धरून आरोपींनी संगणमत करून गैर कायद्याची मंडळी जमून यातील जखमी व मयत हे त्यांच्या क्रमांक एम एच १४ जीजे ९१४३ क्रमांकाच्या दुचाकीवर बसून कोर्टात निलंगा येथे तारखेला जात असताना यातील आरोपी आकाश सोळंके याने त्याचे ताब्यातील स्कार्पिओ क्रमांक एमएच २५ आर ०६९२ या गाडीने करण भीमराव सोळुंके वय ५१ वर्ष व त्याचा मुलगा दीपक करण सोळुंके वय २८ वर्ष हे येळनूर गावाकडे जात असताना त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने पाठीमागू जोराची धडक दिली. यात करण सोळुंके हे जागीच ठार झाले तर त्याचा मुलगा दिपक सोळुंकेहा खाली पडले असता त्यास वाहनातील आरोपीनी लोखंडी रॉड, सळई व लाकडी काठ्या,दगडाने मारून गंभीर जखमी केले त्याच्यावर लातूर येथील रूग्णालयात उपचार चालू आहेत.
तसेच गाडीतून खाली उतरून त्यांचे हातातील लोखंडी रॉड, सळई व काठीने मारहाण करून फिर्यादीचा भाऊ दीपक यास गंभीर जखमी केले. याबाबत विक्रम करण सोळंके वय ३२ वर्ष व्यवसाय शेती रा. येळनूर ता. निलंगा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यातील आरोपी अकाश अनिल सोळुंके गाडी चालक व राहुल अनिल सोळंके, शोभा अनिल सोळुंके, अमर सुनील सोळुंके, सुनील तातेराव सोळुंके, अजित बालाजी सोळुंके,परमेश्वर बालाजी सोळंके,बालाजी रघुनाथ सोळंके, अनंत भागवत मोहिते सर्व राहणार येळणूर यानी कट रचून निलंगा ते शिंदखेड रोडवर किसन रामजी शिंगाडे यांच्या शेताजवळ ही घटना घडली. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ तपास करीत आहेत. यातील आनंत भागवत मोहिते व शोभा अनिल सोळुंके या दोन आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीश खराटे यांनी दि ५ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावले असल्याचे पोलीस निरीक्षक बी आर शेजाळ यांनी सांगितले .