22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeलातूरचेरा येथे बैलाचा मृत्यू

चेरा येथे बैलाचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

जळकोट : प्रतिनिधी
संपूर्ण राज्यभरामध्ये गाय वर्गीय जनावरांमध्ये लंपी या रोगाचा शिरकाव होऊन अनेक जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्या. परंतु आतापर्यंत जळकोट तालुक्यामध्ये लंपी या आजाराने एकाही जनावराचा मृत्यू झाला नव्हता. परंतु आता लंपी या रोगाचा जळकोट तालुक्यामध्ये शिरकाव झाला असून जळकोट तालुक्यातील चेरा येथील एका शेतक-याच्या बैलाचा मृत्यू झाला आहे. यामुळे पशुपालकामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

जळकोट तालुक्यातील चेरा येथील शेतकरी बालाजी रामा मरेवाड यांच्या बैलाच्या अंगावर छोटे छोटे फोड आले. नंतर सदरील जनावराने चारा खाणे सोडून दिले. तसेच पाणी पिणे सोडून दिले. काही दिवसातच बालाजी मरेवाडी यांच्या बैलाचा मृत्यू झाला. यावेळी पशुवैद्यकीय विभागाच्या अधिका-याला याची माहिती देण्यात आली. अधिका-यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी सदरील बैलाचा मृत्यू हा लंपी या आजाराने झाल्याचे पशुवैद्यकीय अधिर्का­यांनी सांगितले. जळकोटच्या पशुवैद्यकीय अधिकारी सुरेखा नामवाड, वांजरवाडा येथील पशुवैद्यकीय अधिकारी बी. एल. जिरगे, ग्रामसेवक श्रीकांत नागुरे, तसेच गावातील इतर नागरिकांच्या उपस्थितीमध्ये पंचनामा करण्यात आला. सदरील शेतक-यास शासनाने आर्थिक मदत द्यावी, मागणी होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या