22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरजबाबदार नागरिक हे भारतीय आर्थिक महासत्तेचे आधारस्तंभ

जबाबदार नागरिक हे भारतीय आर्थिक महासत्तेचे आधारस्तंभ

एकमत ऑनलाईन

लातूर : भारताला आर्थिक महासत्ता बनविण्यामध्ये तीन महत्त्वपूर्ण आधारस्तंभ यांची सखोल अशी चर्चा केली. त्यामध्ये विकसित अर्थव्यवस्था, सक्षम संरक्षण यंत्रणा आणि जबाबदार नागरिक यांचे महत्त्व अधोरेखित करत जबाबदार नागरिक हे भारतीय आर्थिक महासत्तेचे आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगीतले.

लातूर शहरातील दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद विधी महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष तसेच दयानंद विधी महाविद्यालयाच्या सुवर्ण जयंती वर्षानिमित्त आयोजित आर्थिक महाशक्ती बनने के लिए भारत के सामने की चुनोती एवम अवसर या विषयावर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले. त्यावेळीं प्रमुख मार्गदर्शक म्हणून खासदार डॉ. स्वामी बोलत होते. या राष्ट्रीय वेबिनारचे उद्घाटक म्हणून आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरण लाहोटी होते. यावेळी सचिव रमेश बियाणी, सहायक सचिव श्रीकांत उटगे, कोषाध्यक्ष संजय बोरा, क्रीडा समितीचे चेअरमन अ‍ॅड. आशिष बाजपाई, सुदर्शन भांगडिया, प्राचार्या डॉ. पुनम नाथानी, डॉ. प्रमोद शिंदे, विद्यार्थी संयोजक धनंजय सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.

भारताला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी किमान दहा वर्ष तरी दहा टक्के सरासरी सखल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच जीडीपी असायला हवे, असे सांगून डॉ. स्वामी म्हणाले की, त्यामध्ये टप्याटप्याने वाढ व्हावी, तसेच भारतीय अर्थव्यवस्था कार्यक्षम होण्यासाठी गुंतवणूक देखील महत्त्वाचे आहे असे आपले मत विशद केले. या वेबिनारच्या अध्यक्षीय समारोपात लाहोटी यांनी विधी महाविद्यालयातून कायद्याचे अभ्यासक विद्यार्थी म्हणून कशा प्रकारे समाजात कायदा आणि सुव्यवस्था आणि मानवी अधिकारांचे संरक्षण करत आहेत. या महाविद्यालयाने नेहमीच देशाचे सुजाण, विवेकी, कुशल राष्ट्रवादी नेतृत्व घडविले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या