22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरजळकोट तालुक्यातील तीन सोसायट्या बिनविरोध

जळकोट तालुक्यातील तीन सोसायट्या बिनविरोध

एकमत ऑनलाईन

जळकोट : जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था लातूर यांच्या वतीने जळकोट तालुक्यातील अनेक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे . या निवडणुकीत गाव पातळीवर अनेक नेत्यांना आपल्या सोसायटी बिनविरोध करण्यामध्ये यश आले आले आहे .

यामध्ये माजी आमदार सुधाकर भालेराव यांचे गाव असलेले लाळी खुर्द येथील सोसायटी बिनविरोध निघाली आहे ., यासोबतच लाळी बुद्रुक ही सोसायटीही देखील बिनविरोध निघाली आहे यासोबतच माजी पंचायत समिती सदस्य विश्वनाथ इंद्राळे यांचे गाव असलेली केकत सिंंदगी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीदेखील बिनविरोध निघाली आहे. या तीनही गावच्या पुढा-यांंना आपली सोसायटी बिनविरोध आणण्यामध्ये यश आले आहे.

लाळी खुर्द विविध कार्यकारी सेवा सोसायटी मधील बिनविरोध उमेदवारात सर्वसाधारण कर्जदार खातेदार प्रतिनिधी गटातून हनुमंतराव रामदास पाटील, व्यंकट आप्पाराव पटवारी, बालाजी संग्राम बुर्से , यादव मोहनराव घंटेवाड, नारायण रानबा पोळा गडे, रामेश्वर पंडित पाटील, धनराज किशनराव पाटील, हरेश्वर अण्णाराव देवशेटे तर महिला प्रतिनिधी गटातून पार्वतीबाई संग्राम देव शेटे, अनुसया खुशाल बिरादार, इतर मागासवर्गीय गटातून शंकर मठपती , अनुसूचित जाती जमाती गटातून मारोती वाघमारे यांचा समावेश आ.हे.

लाळी बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सोसायटी मधील बिनविरोध उमेदवारात सर्वसाधारण कर्जदार खातेदार प्रतिनिधी गटातून वैजनाथ निवृत्ती चव्हाण, भगवान वसंतराव लाळे , भरत ज्ञानोबा मु लाळे , शुक्राचा रामचंद्र लाळे , बब्रुवान सोपान लाळे, दत्तू पीराजी कोरे , सूर्यकांत व्यंकटराव पाटील , अण्णाराव गणपती वाडकर, अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी गटातून भागीरथा दिगंबर वाघमारे , महिला प्रतिनिधी गटातून निर्मला माधव घोरबांड , छायाबाई अंगद लाळे इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गटातून गंगाधर किशन श्रीमंगले , भटक्या विमुक्त जाती गटातून मोतीराम बाबू को-हे यांचा समावेश आहे.

केकतशिं्दिंगी विविध कार्यकारी सेवा सोसायटी मधील बिनविरोध उमेदवारात सर्वसाधारण कर्जदार खातेदार प्रतिनिधी गटातून विश्वनाथ चाटे, पंडित व्यंकट दळवे, दत्­ता किशन गोंड, मनोहर देविदास गोंड, सूर्यकांत व्­यंकटी दळवे, विश्वनाथ पुंडलीक इंद्राळे, विठ्ठल गणपती चंदावार, दैवशाला माधव केंद्रे, महिला प्रतिनिधी गटातून कांताबाई अच्युतराव दळवे, कमलबाई विश्वनाथ हंगरगे, विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून विठ्ठल गंगाराम केंद्रे, अनुसूचित जाती जमाती गटातून संग्राम केरबा कांबळे हे उमेदवार बिनविरोध निघालेले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या