24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरजळकोट तालुक्यातील २५ गावांचा वीजपुरवठा सुरू करा

जळकोट तालुक्यातील २५ गावांचा वीजपुरवठा सुरू करा

एकमत ऑनलाईन

जळकोट : जळकोट तालुक्यातील या २५ गावांचा वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याचे आदेश संबंधित अधिका-याना द्यावेत अशी मागणी पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याकडे माजी आमदार तथा भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव यांनी केली आहे .

तालुक्यातील ४७ गावांपैकी २५ गावे चार दिवसांपासून अंधारात आहेत.कोळनूर येथील ३३ केव्ही उपकेंद्रातील मुख्य रोहित्र जळाल्यामुळे हा वीजपुरवठा खंडित झाला आहे परंतु मुख्य रोहित्र बसविण्याकडे अधिर्का­-यांचे दुर्लक्ष होत आहे. विजेअभावी नागरिकांचे हाल होत आहेत . नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. जनावरांना पिण्याचे पाणी मिळत नाही. नागरिकांच्या घरात दळण नाही अशी भीषण परिस्थिती निर्मिण झाली असताना या गावाचा वीजपुरवठा सुरळीत करण्याकडे संबंधित अधिर्का­-यांचे दुर्लक्ष होत असून , कोळनूर, करंजी , माळहिप्परगा, पाटोदा बुद्रुक, पाटोदा खुर्द, तिरुका, करंजी, सोनवळा, लाळी बुद्रुक, लाळी खुर्द, एवरी , डोंगर कोनाळी, जंगमवाडी, डोंगरगाव, मरसांगवी, मंगरूळ, बोरगाव, एकुर्का, धनगरवाडी, विराळ यासह अनेक गावे चार दिवसांपासून अंधारात आहेत . या गावांत चार दिवसांपासून लाईट नसल्यामुळे पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे . विजेअभावी गावात भीषण पाणीटंचाई निर्मिण झाली आहे . लाईट नसल्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत . असे असले तरी वीज पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत आहे . वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास रस्त्यावर उतरून मुख्य अभियंता कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी दिला आहे .

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या