26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeलातूरजळकोट तालुक्यातील ७० जणांना विषबाधा

जळकोट तालुक्यातील ७० जणांना विषबाधा

एकमत ऑनलाईन

जळकोट : ओमकार सोनटक्के
जळकोट तालुक्यातून लग्नाला गेलेल्या ७० जणांना अन्नातून विषबाधा झाली आहे . या सर्वच रुग्णावर प्राथमिक आरोग्य केंद्र अतनूर , तसेच ग्रामीण रुग्णालय जळकोट येथे उपचार करण्यात आले. रुग्णांची परिस्थिती चांगली झाल्यानंतर रुग्ण घरी परतले .

जळकोट तालुक्यातील रावणकोळा, मंगरूळ,चिंचोली, डोंगरगाव, जळकोट येथील जवळपास शंभर नागरिक रविवारी कंधार तालुक्यातील दिग्रस खुर्द येथे आपल्या पाहुण्यांच्या लग्नात गेले होते. लग्न लागल्यानंतर त्या ठिकाणी सर्वांनी जेवण केले व संध्याकाळी ते परत आपल्या मूळ गावी परतले. यानंतर यातील ७० जणांना मंगळवारपासून मळमळ, उलटी, ताप, संडास, असा त्रास होऊ लागला. ही माहिती आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांना देण्यात आली यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पवार यांनी आरोग्य कर्मचा-यांंना तात्काळ संबधित गावी पाठवले . प्राथमिक तपासणी केली यामध्ये रुग्णांना विषबाधेची लक्षणे आढळून आली. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वाहनाने जळकोट येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये २६ रुग्णावर तर बाकीच्या रुग्णावर आतनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार करण्यात आले. उपचारानंतर काही रुग्णांना बरे वाटू लागल्यामुळे सुट्टी देण्यात आली.

जळकोट तालुक्यातील रावणकोळा येथील ५५, मंगरूळ येथील ५,चिंचोली येथील ७, डोंगरगाव येथील २ तर जळकोट येथील एका रुग्णावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले. विषबाधेची माहिती कळताच रॅपिड रिस्पॉन्स टीमचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी बरुरे, डॉ श्रीकांत कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे ७ रोग तज्ज्ञ डॉक्टर अशुकेत वैरागे यांनी जळकोट येथील ग्रामीण रुग्णालय तसेच अतनुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील गावांना भेटी दिल्या . याप्रसंगी त्यांच्यासमवेत जळकोट तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पवार उपस्थित होते. जळकोट येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉ जगदीश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली, वैद्यकीय अधिकारी डॉ गजानन मोरे , प्रिया मरवळे , डॉ नामदेव ढोणे यांनी विषबाधा झालेल्या रुग्णांवर उपचार केले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या