26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरजळकोट तालुक्यात उत्सवातही वीज पुरवठा खंडित

जळकोट तालुक्यात उत्सवातही वीज पुरवठा खंडित

एकमत ऑनलाईन

जळकोट : उदगीर जळकोट मतदार संघातील विजेच्या संदर्भात माजी राज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांनी उदगीर येथे महावितरणच्या अधिका-यांची बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी अधिका-यांना धारेवरही धरले होते. यानंतर जळकोट तालुक्यात विजेच्या बाबतीत काहीतरी बदल होईल सुरळीत वीजपुरवठा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती परंतु काहीच सुधारणा झाली नाही. ऐन गणेश उत्सवाच्या काळात जळकोट तालुक्यात वीज जाण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे .

उदगीर जळकोट तालुक्यातील नागरिकांनी विजेच्या संदर्भात तक्रारी केल्या होत्या या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जळकोट तालुक्यातील सरपंच तसेच ग्रामसेवक व अन्य अधिका-यासमवेत उदगीर येथे महावितरणच्या अधिका-यांची महत्त्वपूर्ण बैठक माजी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी घेतली होती . जळकोट शहरात हरतालिका हा सण साजरा केला जात होता या सणा दिवशी काम काढले आणि वीजपुरवठा अनेक तास बंद ठेवला. जळकोटच्या बाजारपेठेत श्री गणेश उत्सवाच्या आगमनाची तयारी करण्यात येत होती.

नागरिक तसेच लहान मुले बाजारपेठेत विविध साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती अशावेळी महावितरणच्या अधिका-यांनी जळकोट शहरातील वीजपुरवठा बंद केला. जळकोट शहरातील सर्व सार्वजनिक श्री गणेशाची स्थापना संध्याकाळी केली जाते . यामुळे महावितरणच्या अधिका-यांनी एक मिनिट सुद्धा लाईट जाणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता होती . बरोबर गणेशाची स्थापना होण्याच्या वेळेस जळकोटमध्ये लाईट गुल झाली.यामुळे माजी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी बैठक घेऊनही विजेच्या बाबतीत काही सुधारणा झाली नसल्याचे दिसून येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या