28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरजळकोट तालुक्यात सोयाबीन पिके वाळू लागली

जळकोट तालुक्यात सोयाबीन पिके वाळू लागली

एकमत ऑनलाईन

जळकोट : जळकोट तालुक्यामध्ये गत पंचवीस दिवसापासून पाऊस नाही. यामुळे जळकोट तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी सोयाबीनच्या पिकाचा धुरळा उडाला आहे . अनेक ठिकाणी चक्क पीक करपून गेले आहे. आज जरी पाऊस झाला तरी शेतक-यांचे ६० ते ७० टक्के नुकसान झाले आहे . यामुळे जळकोट तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे .

तालुक्यामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला होता. या पावसावरच शेतक-यांन पेरणी उरकली. तालुक्यात मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरी सुखावला होता. यानंतर सलग पाऊस झाला. या सलग झालेल्या पावसामुळे शेतीमध्ये पाणी साठवून राहिले आणि पिकांचे मोठे नुकसान झाले. शिल्लक पीक तरी चांगले येईल अशी अपेक्षा शेतक-यांची होती परंतु ही आशाही निसर्गाने हिरावून नेली आहे. डोंगराळ भागावरील पिके चक्क करपून गेले आहे. पिकांना फुल लागायच्या वेळेस व शेंगा लागायच्या सुमारासच पावसाने उघडीप दिल्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.जळकोट तालुक्यातील शेतक-यांची भीस्त सोयाबीन पिकावर आहे

परंतु या सोयाबीनने पावसाअभावी माना टाकल्या आहेत . दिवसभर उन्हाचा तडाखा आहे यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाला आहे. मूग, उडीद यापूर्वीच हातचे गेले आहेत. जळकोट तालुक्यामध्ये यावर्षी कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. हा कापूसही आता पाण्याअभावी अडचणीत सापडला आहे. ज्यांच्याकडे पाणी नाही अशा शेतक-यांना आता कापसाला हाताने पाणी घालण्याची वेळ आली आहे. आता राज्य सरकारने शेतक-यांना मोठी आर्थिक मदत देण्याची गरज आहे. तरच शेतकरी संकटातून उभारू शकेल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या