लातूर : प्रतिनिधी
टीबी मुक्त भारत करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेत जे क्षय रुग्ण दिसून येणार आहेत. त्यांच्यावर मोफत उपचार करून त्यांना पोषण आहार ‘फुड बास्केटचा’ही लाभ दिला जाणार आहे त्यामुळे ज्या व्यक्तींना जास्त दिवस खोकला लागल्यास त्यांनी क्षय रोग चाचणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा क्षय रोग अधिकारी डॉ. शिवाजी फुलारी यांनी पत्रकार परिषदेत केले.
लातूर जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने दि. २१ मार्चपर्यंत क्षय रुग्ण शोधमोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील २४ आरोग्य केंद्रांवर क्षय रोग तपासणी करण्यात येत आहे. उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी येणा-या ३ टक्के रुग्णांचे दररोज नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत. या केंद्रावर साधा टीबी व एमडी टीबीच्या लक्षणांची तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात डिसेंबर २०२२ पर्यंत ३ हजार १८ जणांना टीबीची बाधा झाली होती तर जानेवारी ते आजपर्यंत ४७४ जणांना टीबीची बाधा झाली आहे. त्यापैकी १ हजार १३९ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत तर १ हजार ८७१ टीबीचे रुग्ण सध्या उपचार घेत
आहेत.
लातूर शहरात सर्वाधिक क्षय रुग्ण ८७३ उपचार घेत आहेत. उदगीर तालुक्यात ३११, निलंगा १३१, लातूर ग्रामीण ११९, औसा ११५, अहमदपूर ८६, देवणी ५४, जळकोट ५३, चाकूर ५०, रेणापूर ४५, शिरूर अनंतपाळ येथे ३४ क्षय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २०२५ पर्यंत भारत क्षय रोग मुक्त करण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे.
क्षय रोगाची लक्षणे
दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस खोकला असणे, ताप असणे, वजनात लक्षणीय घट होणे, थुंकीवाटे रक्त येणे, मानेवर गाठ येणे आदी लक्षणे ही क्षय रोगाची ओळखली जातात. अशी लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. क्षय रु ग्णांना सर्व शासकीय रु ग्णालयांत मोफत तपासणी औषधोपचार दिला जात आहे तसेच शासनाकडून ६ महिन्यांपर्यंंत ५०० रु पयांचा पोषण आहारही दिला जात आहे.
या पत्रकार वैद्यकीय अधिकारी
डॉ. हर्षवर्धन राऊत, डॉ. संजय तेलंग यांची उपस्थिती होती.