लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हटले की जिल्ह्यातील शेतक-यांची मातृत्व, अशी ओळख असलेली ही जिल्हा बँक राज्यात अनेक जिल्हा बँका आहेत त्यात राज्यात अव्वल स्थानावर असलेल्या पहिल्या तीन बँकात लातूरची बँक आहे. याच बँकेतील अधिकारी व कर्मचारीही तितकेच तत्पर आणि प्रामाणिक असल्याचा एक प्रसंग घडला. बॅकेत आलेल्या एका प्राध्यापकाचे जास्तीचे आलेले ५० हजार रुपये रोखपालांनी प्राध्यापकास परत दिले.
विलासराव देशमुख, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख बँकेचे अध्यक्ष आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी विविध योजनेतून मदaत करण्याची भूमिका लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यात लातूर बँकेची वेगळी ओळख आहे. असाच एक प्रसंग लातूर जिल्हा बँकेच्या निलंगा मार्केट शाखेत घडला महाराष्ट्र विद्यालयातील प्राध्यापक यांनी बँकेत ५.५० लाख रुपये भरण्यासाठी गेले होते चुकून त्यांच्याकडून रोखपाल यांच्याकडे ६ लाख रुपये दीले गेले मात्र बँकेच्या रोखपाल व्यवस्थापक यांच्याकडे ५० हजार रुपये जास्तीचे आल्याचे लक्षात आले त्यांनी तात्काळ महाराष्ट्र विद्यालय येथे फोन करुन प्रा. नाबदे यांना आपल्याकडून ५० हजार जास्तीचे पैसे आलेले आहेत ते घेवुन जावा म्हणताच त्यांनी जिल्हा बँकेच्या प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी यांचे कौतुक केले बँकेचे खातेदार प्रा. नाबदे यांनी बँकेच्या शाखेचे व्यवस्थापक होसुरे व रोखपाल भोसले यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करुन त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. ही जिल्हा बँकेच्या पारदर्शकता विश्वासाहर्ता जपल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याबद्दल जिल्हा बँकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.