23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरजिल्ह्यातील सर्व गावांत स्वच्छता ही सेवा अभियान

जिल्ह्यातील सर्व गावांत स्वच्छता ही सेवा अभियान

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
दरवर्षी प्रमाणे जिल्ह्यातील सर्व गावांत १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेचे आयोजन करण्यात येते. त्या अनुषंगाने या वर्षी स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमात गावांची दृश्यमान स्वच्छता ही थीम घेऊन हे अभियान गावागावात राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली.

जिल्ह्यात शाश्वत स्वच्छता राहावी व आरोग्यसंपन्न गावे निर्माण व्हावी यासाठी केंद्र शासनाच्या सुचनेनुसार दि. १५ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ गावांमध्ये दृष्यमान स्वच्छतेसाठी एक राज्यव्यापी मोहीम राबविण्याबाबतच्या केंद्र शासनाकडून सूचना प्राप्त झालेल्या आहेत. सदरील कालावधीत खालील उपक्रम राबविण्यात येणार आहेत. गावांमध्ये दृष्यमान स्वच्छता, गावातील कचरा कुंड्या व असुरक्षित ठिकाणांची साफसफाई करणे, कचरा स्त्रोतांच्या ठिकाणी (सुका व ओला) वेगळे करण्यासाठी जनजागृती करणे, कचरा संकलन आणि विलगीकरण करण्यासाठी केंद्र निर्माण करणे, प्लॅस्टिकसारखा अविघटनशील कचरा एकत्रित करुन नियोजन करावे, पाणवठ्याजवळील परिसर स्वच्छ ठेवून त्यांच्या सभोवताली वृक्षारोपण करावे. यापुर्वी प्लॅस्टिक वापरावर बंदीबाबत घेतलेल्या ठरावांची अंमलबजावणी करावी. हागणदारीमुक्त अधिक घटकांवर सरपंच संवाद आयोजित करणे. घोषवाक्य लेखन, प्रतिज्ञा घेणे, कचरा न करणे प्लॅस्टिक बंदी व स्वच्छता या विषयावर वक्तृत्व, निबंध, रांगोळी, सजावट व देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी गणेश मंडळांना आवाहन करण्यात येत आहे.

यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल म्हणाले की, तालुका स्तरावर गटविकास अधिकारी यांनी नियोजन करुन व गावातील संरपच ग्रामपंचायत सदस्य गावातील सामाजिक संस्था व लोकांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन हे अभियान यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे ही आहवान ही त्यानी केले आहे. सदरींल अभियानाचे नियोजन प्रकल्प संचालक जलजीवन मिशन किशोर काळे यांनी केले असून तसा पत्रव्यवहार केला असुन याकामी सर्व यंत्रणाचा सहभाग घेतला जाणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या