36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeलातूरजिल्ह्यातील १०२ पाणंद रस्त्यांचे ऑनलाईन भुमिपूजन

जिल्ह्यातील १०२ पाणंद रस्त्यांचे ऑनलाईन भुमिपूजन

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील १०२ पाणंद रस्त्यांचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन दिनांक २७ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे, असे उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितीन वाघमारे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

यात लातूर तालुक्यातील ३५ रस्ते, निलंगा तालुक्यातील ११ रस्ते, औसा तालुक्यातील ८, जळकोट तालुक्यातील ६ रस्ते, चाकूर तालुक्यातील ८ रस्ते, अहमदपूर तालुक्यातील ७ रस्ते, देवणी तालुक्यातील ७ रस्ते, शिरुर अनंपाळ तालुक्यातील ५ रस्ते, रेणापूर तालुक्यातील ३ रस्ते, उदगीर तालुक्यातील १२ रस्ते असे जिल्ह्यातील एकूण १०२ रस्त्यांचे आणि १११ किलोमीटर एकूण लांबीच्या रस्त्याचे ऑनलाईन भुमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमास खासदार, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधींची उपस्थिती राहणार आहे.

जिल्हा नियोजन समिती, लातूर जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२०२१ साठी जनसुविधेसाठी विशेष अनुदान योजनेतंर्गत पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेसाठी रक्कम रुपये १० कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. या सर्व १०२ कामांना २५ जानेवारी, २०२१ रोजी मान्यता देवून या कामांची प्रशासकीय मान्यता २९ सप्टेंबर, २०२१ रोजी प्रदान करण्यात आलेली आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या