29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeलातूरजिल्ह्यात एका दिवसात ५०२ कोरोनाबाधित रुग्ण

जिल्ह्यात एका दिवसात ५०२ कोरोनाबाधित रुग्ण

एकमत ऑनलाईन

लातूर : जिल्ह्यात शुक्रवार दि. १४ जानेवारी रोजी ५०२ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आरटीपीसीआरच्या १ हजार ३०५ चाचण्यांमध्ये २८६ तर १ हजार १८५ रॅपिड अ‍ॅटिजन चाचण्यांमध्ये २१६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरटीपीसीआर आणि रॅपिड अ‍ॅटिजन असे मिळून एकुण २ हजार ४९० चाचण्यांमध्ये एकुण ५०२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटरमध्ये आजघडीला १ हजार ८३७ रुग्ण उपचार घेत आहेत.. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट २०.२ टक्क्यांवर पोहंचला आहे.

नव वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाचा मीटरची गती वाढली आहे. दररोज शंभरावर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत गेले. गेल्या तीन दिवसांत ४०० पेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळून आले तर शुक्रवारी ही संख्या तब्बल ५०२ वर गेली आहे.३ रुग्ण गंभीर बायपॅप व्हेंटीलेटरवर आहेत. १९ रुग्ण मध्यम ऑक्सिजनवर, ७६ रुग्ण मध्यम परंतू, ऑक्सिजनवर नसलेले आहेत तर १ हजार ७३९ रुग्ण सौम्य लक्षणाची आहेत. शुक्रवारी १ हजार ३०५ व्यक्तींचा चाचणी अहवाल प्राप्त झाला. त्यात ९९८ अहवाल निगेटिव्ह तर २८६ अहवाल पॉझिटिव्ह आले. १ हजार ३०५ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या त्यात २८६ पॉझिटिव्ह तर १ हजार १८५ रॅपिड अ‍ॅटिजन चाचण्यांत २१६ पॉझिटिव्ह आले आहेत. आजपर्यंत ९२२३०१ आरटीपीसीआर व रॅपिड अ‍ॅटिजन चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ९५०७० व्यक्तींचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यापैकी ९०७७९ व्यक्ति उपचाराने बरे होऊन घरी परत गेले तर २ हजार ४५४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या