22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeलातूर‘जीवन विकास’मुळे ३८२ दिव्यांग झाले स्वावलंबी

‘जीवन विकास’मुळे ३८२ दिव्यांग झाले स्वावलंबी

एकमत ऑनलाईन

लातूर : एजाज शेख
जागतिक दिव्यांग दिन दि. ३ डिसेंबर रोजी जगभर साजरा केला जातो. दिव्यांगाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. त्यांना समान जगण्याचा अधिकार आणि हक्क मिळाले पाहिजेत. यासाठी जीवन विकास प्रतिष्ठान लातूर सतत कार्यमग्न आहे. अस्थिव्यंग, कर्णबधिर, दृष्टीबाधित, मतिमंद आदी प्रवर्गातील दिव्यांगांना सामान्य जीवन जगता यावे याकरीता जीवन विकास प्रतिष्ठान लातूरद्वारा संचलित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून ४६४ दिव्यांग लाभार्थ्यांना विविध व्यावसायासाठी १५ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. ८७९ लाभार्थ्यांना विविध व्यावसायासाठी मार्गदर्शन करुन त्यांची कर्ज प्रस्ताव विविध खात्यांकडे पाठविण्यात आले. त्यातील ३८२ दिव्यांग लाभार्थ्यांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होऊन आज ते स्वावलंबी झाले आहेत. ‘दिव्यांग मित्र’ बनून जीवन विकास प्रतिष्ठान कार्य करीत आहे.

जीवन विकास प्रतिष्ठानद्वारा संचलित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्रास राज्य व केंद्र सरकारने सन २००१ मध्ये मंजूरी दिली. केंद्रा स्थापन झाल्यानंतर जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, शासकीय रुग्णालय यांच्या सहकार्याने जीवन विकास प्रतिष्ठानमार्फत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अस्थिव्यंग, कर्णबधिर, दृष्टीबाधित, मतिमंद आदी प्रवर्गातील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी शिबिरे घेण्यात आली व त्याच ठिकाणी अपंगत्वाचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आली. सदर कामे तत्कालीन जिल्हाधिकारी राजीव जलोटा, जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा लव्हेकर, समाज कल्याण अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जीवन विकास प्रतिष्ठानचे रामानुज रांदड, स्व. विजयगोपाल अग्रवाल, जयसिंहराव देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर शिबिरांत २६ हजार ८३४ दिव्यांग लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली.

जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्रातर्फे १८ हजार ३१० लाभार्थ्यांची तपासणी करुन त्यांना साहित्य वाटपासाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. जिल्ह्यात २०९ तपासणी कॅम्प, मोजमाप कॅम्प घेतले असून मार्च २०२१ अखेर ७ हजार ९५ दिव्यांग लाभार्थ्यांना तीन चाकी सायकल, व्हील चेअर, काखेच्या कुबड्या, मनगटी काठ्या, कृत्रिम पाय, कृत्रिम हात, श्रवण यंत्र, पांढ-या काठ्या, चष्मे, कॅल्क्यूरेटर इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले. ४६४ दिव्यांग लाभार्थ्यांना विविध व्यावसायासाठी १५ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. ८७९ लाभार्थ्यांना विविध व्यावसायासाठी मार्गदर्शन करुन त्यांची कर्ज प्रस्ताव विविध खात्यांकडे पाठविण्यात आले. त्यातील ३८२ दिव्यांग लाभार्थ्यांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होऊन आज ते स्वावलंबी झाले आहेत. या वर्षातही जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राकडे उपलब्ध असलेल्या सहित्यातून २० लाभार्थ्यांना साहित्य पुरवठा करण्यात आला.

विलासराव देशमुख यांची औदार्यपुर्ण दुरदृष्टी
जागतिक बँकेच्या एका अहवालात ‘भारतामध्ये अपंग हा सर्वाधिक दुर्लक्षित घटक’ असल्याचे नमूद करण्यात आले होते. ही बाब लक्षात घेता विकासरत्न विलासराव देशमुख यांनी दिव्यांगाच्या क्षेत्रात काही तरी भरीव करण्याच्या दृष्टीने त्यांचे तत्कालीन सहकारी स्व. विजयगोपाल अग्रवाल, रामानूज रांदड व इतरांना सोबत घेऊन जीवन विकास प्रतिष्ठाची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत जीवन विकास प्रतिष्ठानने दिव्यांगांचे शिक्षण, पुनर्वसन या क्षेत्रात केले कार्य संपुर्ण देशभर पोहोचले आहे.

विलासराव देशमुख यांची औदार्यपुर्ण दूरदृष्टी दिव्यांगांसाठी दृष्टी देणारी ठरली. जीवन विकास प्रतिष्ठानचे संस्थापक चेअरमन म्हणून विकासरत्न विलासराव देशमुख यांनी या संस्थेचे अनेक वर्षे कामकाज पाहिले. या संस्थेचे विद्यमान मार्गदर्शक आहेत राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख. चेअरमन जयसिंहराव देशमुख, सचिव नरेंद्र अग्रवाल, उपाध्यक्ष अतुल देऊळगावकर, दिनानाथ भूतडा, संयुक्त सचिव विजयमुर्ती शेटे, श्यामसुंदर भार्गव, कोषाध्यक्ष ललीतकुमार शहा, सदस्य रामानूज रांदड व इतर सदस्य जीवन विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिव्यांगांच्या सर्वांधिण विकासासाठी कार्यरत आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या