लातूर : साखरा येथील वनक्षेत्रात साकारण्यात येणा-या नियोजित जैवविविधता पार्क उभारणीचा शुभारंभ पर्यावरण दिनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या हस्ते वृक्षारोपन करुन करण्यात आला. जिल्हा प्रशासन, वनविभाग व पर्यावरण रक्षणासाठी कार्य करणा-या स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त सहकार्यातून हे उद्यान तयार करण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, तहसिलदार स्वप्नील पावर यांनीही वृक्षारोपन केले. यावेळी विभागीय वनाधिकारी उस्मानाबाद वृषाली तांबे, लातुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रामपूरे, वनपरिमंडळ अधिकारी निलेश बिराजदार, साख-याचे सरंपच बलाजी पाटील, यांत्रिकी विभागाचे स्वामी, बिराजदार, वनरक्षक महेश पवार, बालाजी पाटील, घोगरे यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.