जळकोट: जळकोट ते उदगीर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर अवलकोंडा पाटीजवळ टमटम आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील वरील दोन व टमटममधील दोन जण जखमी झाले आहेत यातील दोघांची परिस्थिती गंभीर आहे. या सर्वांना उदगीर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जळकोट तालुक्यातील विराळ येथील ज्ञानेश्वर सोनटक्के हे आपल्या पत्नीसमवेत खाजगी रुग्णालयात नियमित तपासणीसाठी जात होते. उदगीरकडून वांजरवाडा येथील नागरिक जळकोटकडे येत होते. नळगीर ते नावंदी पाटी दरम्यान असलेल्या अव्वलकोंडा पाटीजवळ टमटम ऑटो व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की दुचाकीवरील पती- पत्नी उडून रोडवर पडले .
त्या दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे तर ऑटोमधीलही रमाकांत बडे हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रसंगी जळकोट तालुक्यातील मंगरूळ येथील सामाजिक कार्यकर्ते शकील पटेल यांनी अपघातग्रस्तांना रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली तसेच घटना स्थळी अनेक नागरिकांनीही धाव घेऊन अपघातातील नागरिकांना मदत केली .