26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeलातूरट्रक-ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात

ट्रक-ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात

एकमत ऑनलाईन

लातूर : येथील लोेकमान्य टिळक चौकात (अशोक हॉटेल चौक) दि. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी खाजगी ट्रॅव्हल्स व ट्रकचा भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही मात्र प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत.

मुंबई, पुणे व इतर ठिकाणाहून लातूर शहरात दररोज सकाळी मोठ्या संख्येने ट्रॅव्हल्स येतात. नित्यनियमाप्रमाणे एक खाजगी ट्रॅव्हल्स बुधवारी सकाळी लोकमान्य टिळक चौकात येऊन थांबली. ट्रॅव्हल्समधील प्रवाशी खाली उतरत असताना धान्य घेऊन जाणा-या ट्रकने पाठीमागुन ट्रॅव्हल्सला जोराची धडक दिली. या अपघातात ट्रॅव्हल्सच्या मागच्या भागाचे व ट्रकच्या पुढच्या भागाचे मोठे नूकसान झाले. ट्रॅव्हल्समधील प्रवाशी किरकोळ जखमी झाले. या अपघाताने सकाळी १० वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूूक विस्कळीत झाली होती.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या