निलंगा : निलंगा औराद शहाजानी रोडवर उदगीर मोड पासन जवळच दि ११ रोजी दुपारी ट्रॅक्टर अपघातातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान लातूर येथील खासगी रुग्णालयात गुरुवारी मृत्यू झाल्याची घटना घडली.
तालुक्यातील गु-हाळ येथील सुमित भानुदास भास्कर वय (२२ वर्ष) बुधवारी एका शेतक-यांच्या शेतात नांगरणी करून गावाकडे परतत असताना उदगीर मोड नजीकच्या गारवा धाब्याजवळ अचानक एक अनोळखी गाडी एकदम समोर आल्याने ट्रॅक्टर कंट्रोल करण्याच्या नादात सुमित तोल जाऊन ट्रॅक्टरच्या खाली पडला. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला लातूर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दुस-या दिवशी गुरुवारी त्याचा मृत्यू झाला. याबाबत लातूर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.