लातूर : प्रतिनिधी
कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचा-यांने लातूर शहरातील विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याची घटना दि. ६ जून रोजी घडली होती. याबाबत त्याच्याविरोधात त्याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनाली आहे. दरम्यान या प्रकरणी त्यास निलंबित करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगीतले, विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार म्हणून सतीश नागनाथ चामे कार्यरत असून तो चार्ली पथकात सध्याला कर्तव्यावर होता.
६ जून रोजी ठाण्यातच महिला अंमलदारासमोरच त्याने सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास गोंंधळ घातला. शिवाय कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस अंमलदारला शिवीगाळ केली. शासकीय कामात अडथळा आणला. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी सतीश चामे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणी त्यास निलंबित करण्यात आले, असे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सांगीतले.