23.6 C
Latur
Saturday, January 28, 2023
Homeलातूरडोंगर कोनाळी तलाव पुलावर आढळला मृतदेह

डोंगर कोनाळी तलाव पुलावर आढळला मृतदेह

एकमत ऑनलाईन

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील कोनाळी डोंगर येथील साठवण तलाव पुलावर सोनवळा नजीक एका २४ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी जळकोट पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पालम तालुक्यातील शेखराजूर येथील सुभाष गुणाजी नागरगोजे कोळनूर येथील यात्रेमधून दि. २ डिसेंबर रोजी संध्याकाळी उशिरा आपल्या बहिणीच्या गावाकडे सोनवळा येथे मोटार सायकल वरून जात होते. मात्र कोळनुर ते सोनवळा दरम्यान असलेल्या डोंगर कोणाळी साठवण तलाव पुलावर मोटरसायकल ही खड्ड्यात गेली. डोक्याला तसेच शरीराच्या इतर भागाला गंभीर जखमा होऊन सुभाष नागरगोजे यांचा जागीच मृत्यू झाला. मोटर सायकल पाण्यात आढळून आली तर मृतदेह पुलाच्या कडेला पडला होता. मात्र सोबत कोण होता हे मात्र कळू शकले नाही. दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. यावेळी गुणाजी कामाजी नागरगोजे शेखराजुर यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यांच्या फिर्यादीवरून जळकोट पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस.आय मिटकरी हे करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या