19.2 C
Latur
Monday, February 6, 2023
Homeलातूरढोरसांगवी ते धामणगाव रस्त्याची दुरवस्था

ढोरसांगवी ते धामणगाव रस्त्याची दुरवस्था

एकमत ऑनलाईन

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील ढोरसांगवी, जिरगा, हावरगा डोमगाव येथील नागरिकांना जळकोटला येण्यासाठी अतिशय खराब झालेल्या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अडचणीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे, असे असले तरी संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असून तात्काळ ढोर सांगवी ते जिरगा मार्गे जळकोट व ढोरसांगवी ते धामणगाव हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी सरपंच संभाजी कोसंबे यांनी माजी राज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांच्याकडे केली आहे .

तालुक्यातील ढोरसांगवी हावरगा, डोमगाव धामणगाव, जिरगा या गावातील नागरिकांना जळकोट येथे तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी जिरगा कुणकी मार्गे जवळचा रस्ता आहे परंतु या रस्त्याची गत दोन वर्षांपासून प्रचंड दूरवस्था झाली आहे . या रस्त्यावरून चार चाकी वाहन आणणे शक्यच नाही परंतु आता तर दुचाकीवर येणेही या मार्गावरून अशक्य बनले आहे . या रस्त्याच्या दूरवस्थेमुळे ढोरसांगवी तसेच जिरगा येथील नागरिक जळकोटला येण्यासाठी धामणगाव मार्गाचा वापर करत होते परंतु या रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे रस्त्यावर खड्डे पडले आहेत .

आता जळकोट या तालुक्याच्या ठिकाणी कोणत्या मार्गावरून जावे असा प्रश्न या गावातील नागरिकांना पडला आहे . कोणत्याही बाजूने गेले तरी रस्ता खराबच असल्यामुळे आता ‘ अशा खराब रस्त्यांना जनता कंटाळली आहे. जळकोट तालुक्याला जोडणारे अतिशय महत्त्वाचे दोन रस्ते असून ही रस्ते तात्काळ दुरुस्त करावेत व वाहनधारकांची तसेच सर्वसामान्य नागरिकांचे होणारे अडचण दूर करावी अशी मागणी ढोरसांगवीचे सरपंच संभाजी कोसंबे यांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या