चाकूर : प्रतिनिधी
येथील जगत्जागृती विद्यामंदिराच्या प्रांगणात तब्बल ४३ वर्षांनी इयत्ता दहावीच्या वर्गातील १९७९ मधील माजी विद्यार्थ्यांचा स्रेह मिलन मेळावा पार पडला असून या मेळाव्यात अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मागील आठवणीला उजाळा दिला शिक्षकांची कृतज्ञता व्यक्त केली . १९७९ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी येथे शिकलेल्या सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. यावेळी या विद्यार्थ्यांना अध्यापन करणारे तत्कालीन शिक्षक वृंद माजी मुख्याध्यापक डी.एच.भोसले, देवराव सावंत, उस्तुर्गे, कुलकर्णी, ढोबळे, इंद्राळे, धोंडगे, मिरकले, शेटे,आलापूरे, मोरगे, मुंडे, जोशी, बारुळे,भाटे, शेरखाने, श्रीमती बिरादार, खंडागळे यांच्यासह महेबुबअली सय्यद व बाबुराव केराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांच्या वतीने प्राचार्य डॉ. दिलीप माने, गोंिवंद झांबरे, सतीश निलंगेकर, अशोक माने, वैजनाथ मस्के, विठ्ठल शास्त्री, अनवर पटेल, उमाकांत झांबरे, वामन जाधव, रमेश घुगे, अंगद कवठे, माधव गोरे, भागवत हैदराबादे, बालाजी शिंदे, मोहम्मद सय्यद, हणमंत नाकाडे यांनी शाळेच्या आठवणी पुन्हा एकदा जागृत केल्या. प्रास्ताविक प्रा.दिलीप महांिलगे यांनी केले. प्रा.डॉ.राजेश तगडपल्लेवार यांनी सुत्रसंचलन व उपंिस्थताचे आभार संभाजी सोनटक्के यांनी मानले.