शिरूर अनंतपाळ :प्रतिनिधी
महावितरणच्या थकबाकी वसुलीत शिरूर अनंतपाळ उपविभाग अंतर्गत शिरूर अनंतपाळ शाखा जिल्ह्यात अव्वल आली आहे तर तालुक्यात थकबाकी वसुलीत उत्कृष्ट काम केल्याबद्दल उपविभागीय अभियंता एल.जी.जोंधळे यांच्या हस्ते महावितरणचे अधिकारी, कर्मचा-याचा विशेष सन्मान करण्यात आला.
शिरूर अनंतपाळ उपविभाग अंतर्गत तालुक्यात कार्यकारी अभियंता संजय पोवार यांच्या सूचनेनुसार उपकार्यकारी अभियंता एल.जी. जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरण कडून थकीत वीज बील बाकी वसुली करण्यात आली. या वसुली मोहिमेला विज ग्राहकाकडून ही चांगला प्रतिसाद मिळाल्याने शिरूर अनंतपाळ शाखा जिल्ह्यात अव्वल आली असून वसुलीत ही तालुका अग्रक्रमांकावर आला आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ वितरण कंपनी मर्यादित उपविभाग शिरूर अनंतपाळ आर्थिक वर्ष २०२१ -२०२२ या कालावधीत नवनवीन संकल्पनेद्वारे प्रभावीपणे देयकांच्या थकबाकी वसुलीसाठी विशेष प्रयत्न करून महावितरण कंपनीचा महसूल वाढवणे व ग्राहकांना उत्कृष्ट सेवा प्रदान केली. यांसह वसुलीच्या दृष्टीने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विशेष कार्यक्रमात अधिकारी व कर्मचा-यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
या प्रसंगी उपकार्यकारी अभियंता एल.जी.जोंधळे, सहाय्यक अभियंता डी.बी.बिराजदार, गणेश गिरी, भुजबळे, प्रविणंिसंह ठाकूर, अर्जुन बिरादार, राम सूर्यवंशी, अमर बावगे, रफीक सय्यद, संपत गुंठे, विजय गोरगीळे, महेश व्यंजने, मारूफ काझी, ज्ञानेश्वर गाडेकर, वैभव कवठकर, प्रवीण बावगे, कृष्णा भोसले, अजय भद्रे याचवाड, जाधव, राठोड आदी उपस्थित होते