25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूर‘दयानंद वाणिज्य’ मध्ये वसुंधरा अभियानाचा शुभारंभ

‘दयानंद वाणिज्य’ मध्ये वसुंधरा अभियानाचा शुभारंभ

एकमत ऑनलाईन

लातूर : येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय सेवा योजना (मंत्रालय कक्ष) उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत दि. ७ जून ते १३ जून या कालावधीत माझी वसुंधरा अभियानाचे आयोजन करण्यात आले. अभियानाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम सोळंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व प्राध्यापक व स्वयंसेवक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज असून त्याकरिता सर्वांमध्ये जनजागृती निर्माण करण्याची गरज सांगितली या अभियानात पर्यावरणाबाबत जनजागृती करणे व स्वच्छता मोहीम राबविण्याकरिता विद्यार्थी व प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान करण्यात आले.

पहिल्या दिवशी महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करुन अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. सुभाष मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती व रा.से.यो कार्यक्रमाधिकारी प्रा. दिपक वेदे, प्रा. श्रीकृष्ण जाधव, प्रा. अमीर शेख, प्रा. ओम जाधव, प्रा. सुनिता नागरगोजे, प्रा. अंकिता अग्रवाल व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी व विद्यार्थिनी या कार्यक्रमास उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या