27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeलातूरदुचाकी चोरीचे ४ गुन्हे उघडकीस

दुचाकी चोरीचे ४ गुन्हे उघडकीस

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषता मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीसआणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने चोरीचे ४ गुन्हे उघडकीस करत १ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच ३ आरोपींना अटक केली आहे.

वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने सदर पथके माहितीचे संकलन करीत असताना, माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, गरुड चौक नांदेड रोड परिसरात चोरीच्या मोटारसायकली खरेदी व विक्रीचा व्यवहार होणार असल्याची मिळाल्याने सदर पथकाने गरुड चौक परिसरात सापळा लावून चोरीच्या मोटरसायकल खरेदी-विक्रीचा व्यवहार करणा-या व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी करण तुकाराम सूर्यवंशी (१९), किशोर सखाराम कांबळे (३०), सुनील अशोक बुक्का (२३) तिघे रा. बनशेळकी रोड उदगीर असे असल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता चौकशी मध्ये त्यांनी त्यांच्याकडील मोटरसायकली ह्या लातूर शहरातील विविध ठिकाणाहून चोरलेल्या असल्याचे सांगितले.

सदर मोटारसायकली संदर्भाने लातूर जिल्ह्यात ४ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेल्या २ मोटरसायकल आणि एक मोबाईल असा १ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आलेला आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे मार्गदर्शनात अमलदार अंगद कोतवाड, माधव बिल्लापट्टे, राजू मस्के, राजेश कंचे, जमीर शेख, नितीन कठारे, नकुल पाटील यांनी पार पाडली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या