लातूर : माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर वृक्ष चळवळ, सह्याद्री देवराई, चैतन्य हास्य क्लब, ज्येष्ठ नागरिक संघ, अंधश्रद्ध निर्मुलन समिती लातूर व प्रियदर्शनी सामाजिक संस्था यांच्यातर्फे राजगड ऑक्सिजन झोन येथे श्रमदान आणि वृक्षारोपण करण्यात आले. तसेच रायगड व राजगड ऑक्सिजन झोन येथील सर्व झाडांना पाणी देण्यात आले.
यापूर्वी राागड ऑक्सिजन झोन येथे एकुण २५० झाडे जगवण्यात आली आहेत. रविवारच्या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड कालिदासराव देशपांडे, नगरसेवक रविशंकर जाधव, लातूर वृक्ष सह्याद्री देवराई समन्वयक सुपर्ण जगताप, ज्येष्ठ नागरिक संघाचे डॉ. बी. आर. पाटील आणि अंनिसचे शहराध्यक्ष प्रा. दशरथ भिसे, चैतन्य हास्य मंडळाचे माणिकराव माने, यांंच्या हस्ते वड, पिंपळ वृक्ष लावण्यात आली. यावेळी बाळासाहेब नरवणे, बाबुराव डांगे, प्रियदर्शनी संस्थेचे अॅड. सुनील गायकवाड, अॅड. युसुफ शेख, अमृत सोनवणे, माणिकराव हंडरगुळे, व सर्व संस्थांचे अनेक सदस्य यावेळी उपस्थित होते.
तसेच वाढदिवसानिमित्त विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा देवराई येथे दुर्मिळ ३४ पेक्षा जास्त वृक्षांची अंजन, अजान, कवट, मेंढशिंगी, वरुण वृक्ष, पांगरा, काटेसावर, सोनसावर, काळा शिरीष, सिसम या वृक्षांच्या बिया गोळा करुन त्यांच्या रोपांची निर्मिती केली. ही सर्व झाडे पावसाळ्यात लावून महाराष्ट्रातील एक जैव विविधता प्रकल्प तयार करत आहोत. ज्यामुळे ही दुर्मिळ झाडे आपल्या भागात वाढतील.