चाकूर : तालुक्यातील हाळी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दिव्यांग शिक्षिका श्रीमती नंदा ईराप्पा नरहरे यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल तर्फे दिला जाणारा ‘सेवासन्मान राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२’ जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण पुणे येथे विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
श्रीमती नरहरे यांना ७८ टक्के शारीरिक अपंगत्व आहे. त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. या कार्यांची दखल पुरस्कार निवड समितीचे सदस्य दिपक चामे, रंगनाथ सगर, रविराज देशमुख, जयराज सोदले यांनी घेतली. या निवडीचे पत्र गट शिक्षण अधिकारी संजय आलमाले, तालुक्यातील केंद्रप्रमुख, रविराज देशमुख, जयराज सोदले यांच्या हस्ते देण्यात आले. पुरस्काराचे वितरण अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, पुणे येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार (दि.१५ मे २०२२) रोजी सकाळी ९ वाजता केले जाणार आहे.