24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeलातूरनळाद्वारे येणारे पिवळसर पाणी पिण्यास योग्य

नळाद्वारे येणारे पिवळसर पाणी पिण्यास योग्य

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
सध्या लातूर शहरात नळद्वारे पिवळसर पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांमधून तक्रारी वाढल्या आहेत. परंतू, नळाद्वारे येणारे हे पिवळसर पाणी पिण्यास योग्य असल्याचे महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता यांनी प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे.

लातूर शहर पाणी पुरवठा योजना मुख्य स्त्रोत असलेले मांजरा धरण क्षेत्रामध्ये पावसाळ्यात, हिवाळ्यात पाण्यामध्ये शेवाळाचे प्रमाण असल्याने व सध्या वाढलेल्या तापमानामुळे पाण्याची पातळी घटत जाते. विरघळलेले ऑक्सिजनचे प्रमाण पाण्यात कमी होत जाते. त्यांमुळे पाण्यामध्ये शेवाळ निर्मिती प्रक्रिया जलद गतीने होते.

जसे शेवाळ वितरीत पाणी क्लोरीनच्या सानिध्यात येते त्या­मुळे कधी कधी पाण्याचा पिवळसर कलर येतो. सदरचे पाणी हरंगुळ जलशुध्दीकरण केंद्र येथे जलशुध्दी करण प्रक्रियेमध्ये जसे ब्लिचींग पावडर, तुरटी, क्लोेरीन गॅस व पीएसी पावडरचा वापर करुन पिवळसरपणा कमी करण्यात येत आहे.

सदर पाण्याची जलकुंभनिहाय पाणी चाचणी घेतली असता सदरचे पाणी अनुजैविकदृष्याा पिण्यास योग्यच आहे. तसेच जलशुध्दीेकरण केंद्र येथील फिल्टर सीएफएल स्वच्छतेचे काम सुरु आहे, अशी माहीती कार्यकारी अभियंता, महानगरपालिका लातूर यानी दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या