21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeलातूरनवोदय विद्यालयाचे सीबीएसई परीक्षेत यश

नवोदय विद्यालयाचे सीबीएसई परीक्षेत यश

एकमत ऑनलाईन

लातूर : केंद्रिय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) नवी दिल्ली यांचे मार्फत मे २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १० आणि १२ वी विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून सर्वच्या सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. इयत्ता १० वी मध्ये कुमारी प्रीती प्रभाकर पडघन ही ९६.६० टक्के गुण घेऊन सर्वप्रथम आली आहे. इयत्ता १० वी चा निकाल १०० टक्के लागला असून ८० विद्यार्थी पैकी ६४ विद्यार्थी दिसटिक्शनने उतीर्ण झाले आहेत. एवढेच नव्हे तर २४ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उतीर्ण झाले आहेत.

इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत कुमार सुयोग बालाजी अलिबादे हा ९४ टक्के गुण घेऊन सर्वप्रथम आला आह.इयत्ता १२ वी चा निकाल १०० टक्के लागला असून ४४ विद्यार्थी पैकी ३५ विद्यार्थी दिसटिक्शनने उतीर्ण झाले आहेत. ६ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उतीर्ण झाले आहेत. जवाहन नवोदय विद्यालय, लातूरच्या नेत्रदिपक यशाची परंपरा सतत कायम राखल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य जी रमेश राव आणि विद्यालय प्रबंधक कमीटीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांनी विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या